Vijaykumar Dudhale
रामदास कदम यांचा कोकणात ठिकठिकाणी भाजपकडून निषेध करण्यात आला.
लोकसभेवेळी रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी करोडो रुपये वाटल्याचा आरोप केला. रामदास कदम यांनी केलेला आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा बंद : केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष
हिंमत असेल तर रामदास कदमांनी युती तोडल्याचे जाहीर करावे, आम्ही दाखवून देऊ तुमची काय ताकद आहे : केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष
रामदास कदम यांना ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ याशिवाय जगामध्ये कोणीही चांगले वाटत नाही : केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष
रामदास कदम यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगा योगेश कदम यांच्या पराभवाने पछाडले आहे. त्यातूची ते मित्रपक्षाविषयी अशी विधाने करीत आहेत : केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष
आम्हाला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी दापोलीतून योगेश कदम हा उमेदवारच नको : केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष
रामदास कदम यांचा वयामुळे आता तोल सुटत आहे. आम्ही तुमच्यासारखे बोलू शकत नाही. आम्ही सुसंस्कृत भाजपच्या मुशीतले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ते ज्या वृद्धाश्रमाचे प्रमुख आहेत तेथे त्यांनी जावे : बाळ माने, रत्नागिरी
कृपा करून योगेश कदम यांचे भवितव्य बिघडवू नका. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका. रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी; अन्यथा आंदोलन तीव्र करू : बाळ माने, रत्नागिरी