Rashmi Mane
लोकसभेसाठी खासदार थेट जनतेतून निवडले जातात हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का राज्यसभेसाठी खासदार कोण निवडतात.
राज्यसभेच्या निवडणुका कशा घेतल्या जातात आणि कसे मतदान करतात ते बघू...
राज्यसभेच्या निवडणुका इतर निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. रॅली नाही, गर्दी नाही, नेत्यांची घोषणाबाजी नसते.
राज्यसभा निवडणुकीत जनता थेट सहभागी होत नाही, तर लोकप्रतिनिधी राज्यसभेचे खासदार निवडण्यासाठी मतदान करतात.
राज्यसभेचे खासदार हे विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात. मात्र, विधान परिषदेचे सदस्य त्यात सहभागी होत नाहीत.
सोप्या शब्दात सांगायचे तर, एखाद्या पक्षाचे जितके जास्त आमदार असतील, तितके राज्यसभा खासदार त्या पक्षाचे असतील.
राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा वेगळा फॉर्म्युला असतो आणि याच सूत्राचा वापर करून राज्यसभेचे खासदार निवडले जातात.