राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांमधील नेमका फरक काय? कुणाला अधिकार जास्त असतात?

Ganesh Sonawane

संसद

भारतीय संसद दोन सदनांनी मिळून बनली आहे. राज्यसभा (वरिष्ठ सदन) आणि लोकसभा (कनिष्ठ सदन).

Rajya Sabha and Lok Sabha difference | Sarkarnama

लोकसभा खासदार

'जनतेचे सदन' म्हणून लोकसभा ओळखली जाते. कारण यातील सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जातात. त्यांना आपण खासदार म्हणतो.

Rajya Sabha and Lok Sabha difference | Sarkarnama

राज्यसभा खासदार

'राज्यांचे सदन' म्हणून राज्यसभा ओळखली जाते. कारण यातील सदस्य राज्यांच्या विधानमंडळांद्वारे निवडले जातात.

Rajya Sabha and Lok Sabha difference | Sarkarnama

राज्यसभा आणि लोकसभा सदस्य

भारताच्या राज्यघटनेनुसार लोकसभा सदस्यांची संख्या 552 इतकी आहे. राज्यसभा सदस्यांची संख्या 250 इतकी आहे.

Rajya Sabha and Lok Sabha difference

राष्ट्रपतींकडून १२ सभासदांची नेमणूक

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Draupadi Murmu | Sarkarnama

निवड

राज्यसभेच्या इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केद्रशासित विधिमंडळ म्हणजेच राज्यातून निवडून गेलेले आमदार मतदान करुन राज्यसभेवर सदस्यांची नियुक्ती करतात.

Rajya Sabha and Lok Sabha difference | Sarkarnama

कालावधी

लोकसभा खासदाराचा कालावधील 5 वर्षांचा असतो. तर राज्यसभा: स्थायी सदन, कधीही विसर्जित होत नाही. प्रत्येक सदस्य 6 वर्षांसाठी, 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.

Lok Sabha | Sarkarnama

अध्यक्ष/सभापती

लोकसभा अध्यक्ष (सदन सदस्यांमधून निवड)

राज्यसभा: सभापती (उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात)

Rajya Sabha and Lok Sabha difference

अधिकार

लोकसभा खासदाराला राज्य सभा खासदारापेक्षा अधिक अधिकार असतात. महत्वाचे ठराव पहिले लोकसभेत मंजूर केले जातात. नंतर राज्यसभेत मंजूरीसाठी पाठवले जातात.

Rajya Sabha and Lok Sabha difference

पंतप्रधान

लोकसभेच्या निवडणुकीतून जे खासदार निवडून येतात त्यातून एक देशाचा पंतप्रधान नियुक्त करण्यात येतो.

NEXT : Love Marriage साठी घ्यावी लागणार आई-वडिलांची परवानगी, काय आहे सरकारचा नवा नियम?

येथे क्लिक करा