Rakesh Daultabad : राकेश दौलताबाद यांच्या निधनाने हरियाणातील भाजप सरकारची वाढली धाकधुक!

Mayur Ratnaparkhe

हरियाणातील अपक्ष आमदार राकेश दौलताबाद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

राकेश दौलताबाद यांच्या जाण्याने हरियाणमधील आधीच अल्पमतात असणाऱ्या भाजप सरकारची धाकधुक वाढली आहे.

गुरुग्रामच्या बादशाहपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहचले होते.

पालम विहारच्या मणिपाल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीत अपक्ष विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपलाच पाठिंबा जाहीर केला होता.

राकेश दौलताबाद यांची प्रतिमा एक समाजसेवी नेता म्हणून होती.

Next : सहाव्या टप्प्यात या दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतपेटीत झाले बंद

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama