Mangesh Mahale
आलिशान राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी हे वनताराची जबाबदारी सांभाळतात.
'वनतारा' म्हणजे 'जंगलामधील तारा'अशी ओळख असलेला हा प्रकल्प पंचताराकिंत हॉटेल प्रमाणे आहे.
हत्ती ,वाघ, हरिण, कासव, घोडे अशा विविध प्रकारच्या हजारो प्राण्यांचा येथे निवारा आहे.
प्राण्यासाठी येथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार दिला जातो.
आंतरराष्ट्रीय डॅाक्टरांची टीम प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेते.
प्राण्यांसाठीचा ताजमहल अशी ओळख असलेल्या वनतारावर अनंत अंबानी दरवर्षी 150 ते 200 कोटी खर्च करतात
वैद्यकीय सुविधा, उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करुन वनतारा सोयी-सुविधांनी सज्ज आहे.
प्राण्यांसाठीचे हे उपचार केंद्र नसून त्यांना जंगलासारखाच नैसगिक अधिवास लाभतो. 3 हजार एकरमध्ये पसरलेले आहे.
आफ्रिका, थायलंड, अमेरिकेतून काही प्राणी येथे आहेत. प्राणीप्रेमींसाठीचे हे महत्वाचे ठिकाण आहे.
पैशातून केवळ राजवाडाच नव्हे तर प्राण्यांसाठी घरही बांधता येते, हे वनतारानं सिद्ध केले.