Raksha Khadse : ...म्हणून भाजपच्या रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढणार!

Deepak Kulkarni

रावेरमध्ये भाजप विरुद्ध शरद पवार गटात लढत

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

यंदा हॅट्रिकसाठी मैदानात

महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यंदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरल्या आहेत.

Raksha Khadse | Sarkarnama

उमेदवारीवर अगोदर टांगती तलवार

खडसे राजकीय फॅक्टरमुळे प्रारंभी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवार टांगती तलवार होती.

Raksha Khadse | Sarkarnama

दिल्लीतून फिरली चक्रे...

मात्र, शेवटच्या टप्प्यात खडसे यांनी दिल्लीतून फिरविलेली चक्रे आणि स्थानिक राजकारण यामुळे ही अनिश्चितता संपुष्टात आली.

Raksha Khadse | Sarkarnama

पहिल्याच यादीत नाव

भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव होते.

प्रचारासाठी दोन महिन्यांचा कालावधी

त्यांना प्रचारासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी मिळाला.

Raksha Khadse | Sarkarnama

महाविकास आघाडीने उचलला प्रश्न...

पण या निवडणुकीत महाविकास आघाडीने केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी हा अतिशय गंभीर प्रश्न प्रचारात उचलून धरला.

केळी निर्यातीत वाढ झालेली नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी हा अतिशय गंभीर प्रश्न महाविकास आघाडीने उपस्थित केला

Raksha Khadse | Sarkarnama

केळी उत्पादकांमुळे वाढली डोकेदुखी

रावेर आणि केळी हे एक समीकरण आहे. या समीकरणा भोवती यंदाची निवडणूक फिरत होती. दहा हजार केळी उत्पादकांना प्रलंबित प्रश्नांमुळे रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Raksha Khadse | Sarkarnama

NEXT : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले भविष्य