Rashmi Mane
22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. सोमवारी रामलल्लाला पूर्ण विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला.
प्रभू श्री रामाची सुंदर, सुबक मूर्ती बघून सगळ्यांचे डोळे समाधानाने भरून आले.
अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यात अजून एक आकर्षणाचा विषय होता तो म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीवरील दागिने.
रामलल्ला पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेल्या त्यांच्या स्वरूपावर आधारित अनेक दिव्य अलंकार आणि वस्त्रांनी सजवले गेले आहे.
अध्यात्म रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण, श्री रामचरितमानस आणि आळवंदर स्तोत्र यांचे संशोधन आणि अभ्यास करून आणि त्यात वर्णन केलेल्या श्रीरामाच्या शास्त्राधारित सौंदर्यानुसार रामलल्लाचे दागिने तयार करण्यात आले आहेत.
प्रभू रामाचे दागिने बनवण्यासाठी 15 किलो सोने आणि सुमारे 18 हजार हिरे आणि पाचू वापरण्यात आले आहेत.
टिळक, मुकुट, 4 नेकलेस, कमरबंद, दोन जोडे पायल, विजय माला, दोन अंगठ्या असे एकूण 14 दागिने तयार करण्यात आले आहेत. हे दागिने अवघ्या 12 दिवसांत तयार करण्यात आले आहेत.
हे दागिने तयार करण्याची जबाबदारी लखनौच्या हरसहयमल श्यामलाल ज्वेलर्सकडे सोपवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम मंदिर ट्रस्टने 15 दिवसांपूर्वी ज्वेलर्सशी संपर्क साधला होता.