Rashmi Mane
आज (23 जानेवारी) नाशिकला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे महाअधिवेशन झाले.
नाशिकमधील सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाधिवेशन पार पडले.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिकांचा परिवार एकत्र आला.
उद्धवसाहेब ठाकरे मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 'राम कोणत्या एका पक्षाचा देव नाही तर सगळ्यांचा आहे.'अशा शब्दात ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.
या अधिवेशनाला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
शिवसेनेच्या खासदार संजय राऊत त्यांच्यासोबत माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.