सरकारनामा ब्यूरो
अयोध्येतील राम मंदिराचा ध्वजारोहण सोहळा आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे हे प्रतीक आहे.
ध्वजारोहण सोहळा राम विवाह पंचमीच्या शुभ मुहूर्तावर, अभिजीत मुहूर्तात सकाळी 11:45 ते दुपारी 12:29 यावेळेत पार पडला.
हिेंदु धर्मात मंदिरावर ध्वज लावणे याला विशेष महत्व आहे. ध्वजाला विजय, शक्ति, आणि शुभ, तसेच दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते.
ध्वजारोहन सोहळ्याच्या पुर्वसंध्येला आयोध्या नगरी आणि राम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजले होते.
ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे, तसेच ध्वजावर 'सूर्य', 'ॐ' आणि कोविदार वृक्षाची प्रतीके आहेत. वेगाने वाऱ्याचा सामना करण्यासाठी एका पॅराशूट तज्ज्ञाने या ध्वजाची रचना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रिमोटचे बटण दाबून 161 फूट उंच मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवला. या वेळी 'जय श्री राम' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
राम विवाह पंचमीच्या शुभ आणि पवित्र मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण अयोध्या पुन्हा एकदा भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.
अयोध्या राम मंदिरात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. भव्य दिव्य राम मंदिरावर ‘धर्म ध्वजा’ फडकवून मंदिराच्या पूर्णत्वाचे प्रतीकात्मक अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाले.