Sachin Fulpagare
उत्तर प्रदेशातील शाळा, कॉलेजेसह सर्व शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा राष्ट्रीय उत्सव असल्याचे योगी सरकारने म्हटले आहे. यूपीत 22 तारखेला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
अयोध्या दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
सोहळ्याची सुरक्षा आणि इतर व्यवस्थांसाठी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले.
सध्या 3800 स्वच्छता कर्मचारी तैनात आहेत. आणखी 1500 कर्मचारी ढवले जातील.
10-10 बेडची आरोग्य केंद्र तयार करणार. तसेच अॅम्ब्युलन्स आणि आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार.
लखनऊ, प्रयागराज आणि गोरखपूरमधून अयोध्येसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्याचे योगींचे आदेश
अयोध्येसाठी डिजिटल टुरिस्ट अॅप बनवा. अयोध्येतील सर्व सुविधांची आणि प्रमुख ठिकाणांची माहिती त्यातून द्या, असे आदेशही योगींनी दिलेत.