सरकारनामा ब्यूरो
आज रविवार (ता.6) रामनवमीनिमित्त अनेक नेते मंडळीनी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत सहभागी घेतला होता.
नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरात श्रीरामाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी श्रीराम जन्मोत्सवात सहभागी झाले होते.
नागपूरमध्ये रामभक्तांसोबत मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मिरवणुकीत सहभाग घेत श्रीराम जन्मोत्सवाचा रथ ओढला.
रथात असलेल्या श्रीरामाच्या मुर्तीला पुष्प अर्पण करत आशीर्वाद घेतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत भक्तीभावाने श्रीरामाचे दर्शन घेतले.
शोभायात्रेवेळी मुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे, आणि अन्य रामभक्त जमले होते.