Ram Satpute : राम सातपुतेंनी पुन्हा फुंकले मोहिते पाटलांविरोधात रणशिंग

Vijaykumar Dudhale

सोलापुरात पराभव

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडून सुमारे 74 हजार मतांनी पराभव झाला आहे.

Ram Satpute | Sarkarnama

माळशिरसमध्ये पुन्हा सक्रिय

लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरून राम सातपुते यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा घेत माळशिरस विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

Ram Satpute | Sarkarnama

धैर्यशील माेहिते पाटील टार्गेट

माळशिरसमधील पहिल्याच मेळाव्यात राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील माेहिते पाटील यांना टार्गेट करत लोकसभा निवडणुकीत बीडचं पार्सला एका रात्रीत बीडला पाठवू या विधानाला उत्तर दिले.

Ram Satpute | Sarkarnama

त्यांना 80 हजारांचेही मताधिक्य घेता आलं नाही

माळशिरसमधून एक लाख 80 हजारांचे मताधिक्य मिळवून दाखवू म्हणणाऱ्यांना 80 हजारांचे ही मताधिक्य मिळवता आले नाही.

Ram Satpute | Sarkarnama

माळशिरस सोडून कुठेही जाणार नाही

मी माळशिरस सोडून कुठेही जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माळशिरसमधील जनतेच्या सेवेसाठी मी स्वतःला मातीत गाडून घेईन.

Ram Satpute | Sarkarnama

मी संस्कार सोडले नाहीत

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मला हिणवलं, माझं पार्सल बीडला पाठवण्याची भाषा केली गेली. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली. परंतु मी माझ्या संस्काराची पातळी सोडली नाही.

Ram Satpute | Sarkarnama

मी तुमचा सालगडी

मागील पाच वर्षे साल गडी म्हणून मी काम केले आहे.

Ram Satpute | Sarkarnama

माझे अंत्यसंस्कारही माळशिरसच्या मातीतच होतील

तुम्ही मला पार्सल म्हणून बीडला पाठविण्याची भाषा केली. पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या जनतेची सेवा करीन. मी मेल्यानंतरही माझे अंत्यसंस्कार माळशिरस तालुक्याच्या मातीत होतील.

Ram Satpute | Sarkarnama

पंकजा मुंडेंचा पराभव ते जरांगेंना टोला; वडीगोद्रीत भुजबळ काय

Chhagan Bhujbal | Sarkarnama