Rajanand More
IAS श्रीकांत खांडेकर हे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचे जावई आहेत. ते बिहार केडरचे अधिकारी असून सध्या पाटणा येथे उप विकास आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे.
राम शिंदे यांच्या कन्या अक्षता आणि श्रीकांत यांचा विवाह २०२१ मध्ये झाला आहे. अक्षता या डॉक्टर आहेत. लग्नापूर्वी त्या चौंडीतच काम करत होत्या.
खांडेकर हे IAS झाल्यानंतर गावकऱ्यांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरले. त्यासाठी सभापती शिंदेंना बोलाविण्यात आले होते.
खांडेकर यांनी प्रचंड कष्ट आणि हुशारीच्या जोरावर मिळविलेले यश पाहून शिंदे भारावले होते. तिथूनच शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची सोयरीक जुळण्यास सुरूवात झाली.
खांडेकर यांचे प्रशिक्षण सुरू असतानाच लग्न ठरले. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी व्हॅलेंटाईन डे दिवशी साखरपुडा आणि जून महिन्यात लग्न झाले.
IAS खांडेकर हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका छोट्याशी गावातील आहे. शेतकरी कुटुंबात जन्म. आर्थिक स्थिती दयनीय होती.
कर्जाचे हप्ते फेडणेही कुटुंबाला शक्य होत नव्हते. त्यावेळी श्रीकांत हे दापोली येथील कृषी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत होते.
अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले अन् UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. २०२० मध्ये परीक्षा क्रॅक करत स्वप्नपूर्ती केली. बिहार केडरमध्ये निवड. आज बिहारमध्ये त्यांनी कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.