सरकारनामा ब्यूरो
भारतातील प्रसिध्द शिल्पकार राम सुतार हे राजकोटवरील शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणार आहेत. ते 99 वर्षांचे आहेत.
धुळे जिल्ह्यातील गोंडूर हे मुळ गाव असलेल्या राम सुतार यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून शिक्षण पूर्ण केले आहे.
1959 मध्ये त्यांनी दिल्लीतील माहिती व दूरसंचार मंत्रालयातील नोकरी सोडली आणि शिल्पकार म्हणून काम सुरु केले.
सुतार यांनी 1954 ते 1958 या दरम्यान अजिंठा आणि वेरूळ लेण्यांच्या पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले.
महात्मा गांधी, गोविंद वल्लभ पंत, सरदार पटेल, रणजित सिंग यांसारख्या व्यक्तिमत्वांचे पुतळे सुतार यांनी उभारले आहेत.
सुतार यांनी भारतातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' या सरदार पटेलांच्या पुतळ्याची निर्मिती केली आहे.
उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारकडून सुतार यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आता राम सुतार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार आहेत.