सरकारनामा ब्यूरो
कविमनाचे राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेले लोकप्रिय नेते रामदास आठवले यांचा आज (ता.25) वाढदिवस आहे.
रामदास आठवलेंचे भाषण नेहमीच वेगळे ठरत असते. बोलण्याचा वेगळा टोन आणि मध्येच कवितांचा वापर यामुळे त्यांचे भाषण हे मनोरंजक ठरते.
त्यांना एकदा एका कार्यक्रमात रामदास आठवले कोण आहेत? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी रसिकांना काव्यातून उत्तर दिले होते.
राज्यसभेत GST वर चर्चा सुरू असताना त्याबद्दल महत्त्व पटवून देणारी त्यांची ही कविता लोकप्रिय झाली होती.
नितीन गडकरींना 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काव्यात्मक पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं समतेचं स्वप्न आपण कसं पूर्ण करणार ? या कवितेद्वारे त्यांनी आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत.
रामदास आठवले यांचा सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
अशा शब्दात कविता करून त्यांनी रशिया - युक्रेन युद्ध थांबून, शांती प्रस्थापित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
"माझा वाढदिवस फक्त नावापुरता साजरा करू नका, मला विषमतेचा अंत झालेला याचि देही याचि डोळा पाहायचा आहे." असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.