ढग खरंच फुटतात का? 'ढगफुटी'मागचं विज्ञान जाणून घ्या

Jagdish Patil

जनजीवन

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे मुंबई, पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

What is Cloudburst | Sarkarnama

महामार्ग

अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत तर अनेक महामार्ग ठप्प झाले आहेत.

What is Cloudburst | Sarkarnama

आवाहन

याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलंय, तर नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे.

What is Cloudburst | Sarkarnama

ढगफुटी

याच निमित्ताने 'ढगफुटी' म्हणजे नेमकं काय? ती खरंच धोकादायक असते का ते जाणून घेऊया.

What is Cloudburst

प्रचंड पाऊस

ढगफुटी ही हवामानाशी संबंधित एक घटना आहे. ज्यामध्ये कमी वेळात एखाद्या परिसरात प्रचंड पाऊस पडतो.

What is Cloudburst | Sarkarnama

हवामान विभाग

हवामान विभागाच्या मते, '20 ते 30 चौरस किमी. परिसरात एका तासात 100 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला ढगफुटी म्हणतात'.

What is Cloudburst | Sarkarnama

घटना

'ढगफुटी'त नावाप्रमाणे ढग फुटत नाहीत, तर ही घटना वातावरणातील विशिष्ट प्रक्रियांमुळे घडून येते.

What is Cloudburst

बाष्प

समुद्रावरून आलेली बाष्प असलेली हवा डोंगराळ भागात येते आणि पर्वतांच्या उतारांमुळे वेगाने वरच्या दिशेने ढकलली जाते.

What is Cloudburst | Sarkarnama

ओरोग्राफिक लिफ्ट

या प्रक्रियेला 'ओरोग्राफिक लिफ्ट' म्हणतात. वर जाताच या हवेचे तापमान कमी होते आणि त्यातून मोठे ढग तयार होतात.

What is Cloudburst

दाट ढग

खालून वर जाणारी हवा ढगातील पाण्याच्या थेंबांना खाली पडू न देता पुन्हा वर ढकलते. ज्यामुळे ढग आणखी दाट होतात.

What is Cloudburst | Sarkarnama

पाणी कोसळते

त्यामुळे ढगामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते आणि काही काळाने उर्ध्वगामी वाऱ्यांचा वेग कमी होताच ढगात साचलेलं पाणी एकाच वेळी खाली कोसळते.

What is Cloudburst | Sarkarnama

पूरस्थिती

यामुळे कमी वेळात प्रचंड पाऊस पडतो, परिणामी जमिनीला पाणी शोषून घेण्यासाठी वेळ न मिळाल्याने त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.

What is Cloudburst? | Heavy Rain | Flood Risk | Sarkarnama

NEXT : राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! कुठे होर्डिंग पडले तर कुठे दरडी कोसळल्या; थरकाप उडवणारे PHOTOS आले समोर

Maharashtra Heavy Rain | Sarkarnama
क्लिक करा