Ramesh Thorat : रमेशअप्पा थोरात पुन्हा विधानसभेच्या मैदानात!

Vijaykumar Dudhale

महायुतीत बंडखोरी अटळ

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा दौंडमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.

Ramesh Thorat | Sarkarnama

विधानसभेच्या चार निवडणुका लढवल्या

रमेश थोरात यांनी विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चार पंचवार्षिक निवडणुका दौंड मतदारसंघातून लढवल्या आहेत.

Ramesh Thorat | Sarkarnama

तीन निवडणुकांत पराभव; एकात विजय

विधानसभेच्या चार निवडणुकांपैकी तीन निवडणुकांत रमेश थोरात यांचा पराभव झाला, तर 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते

Ramesh Thorat | Sarkarnama

746 मतांनी पराभव

दौंड विधानसभेची मागील 2019 ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली. त्यात निवडणुकीत रमेश थोरात यांचा केवळ 746 मतांनी पराभव झाला होता.

Ramesh Thorat | Sarkarnama

‘भीमा-पाटस’चे अध्यक्ष

रमेश थोरात यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

Ramesh Thorat | Sarkarnama

पीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून रमेश थोरात यांची कारकिर्द विशेष उल्लेखनीय ठरली.

Ramesh Thorat | Sarkarnama

अजित पवारांना साथ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला

Ramesh Thorat | Sarkarnama

पुन्हा कुलांविरोधात लढणार

मागील निवडणुकीत ज्यांनी पराभव केला, ते राहुल कुल आणि रमेश थोरात महायुती सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ते राहुल कुल यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Ramesh Thorat | Sarkarnama

खरचं भाजपमध्ये पुन्हा 'एन्ट्री' आहे का?

Eknath Khadse | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा