सरकारनामा ब्यूरो
देशात अनेक IPS आणि IAS अधिकारी दाम्पत्याच्या जोड्या आहेत. परंतु क्वचितच असं घडतं की पत्नीची एखाद्या पदावरून बदली झाल्यानंतर तिच्या जागेवर पतीची पोस्टिंग होते. जाणून घेऊयात कोण आहेत हे दाम्पत्य...
राजस्थान सरकारने काही दिवसांपूर्वी अनेक IAS,IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यातीलच एक नाव या IPS जोडी रजित शर्मा आणि सागर राणा यांचा आहे.
रंजिता शर्मा यांची दौसा जिल्ह्यातील एसपी म्हणून मुख्यालयात बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी पती सागर राणा यांची दौसाचे नवीन एसपी पदावर नेमणूक करण्यात आली.
रंजिता या मूळच्या हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांचे पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
त्यांना UPSCच्या परीक्षेत 5 वेळा अपयश आले होते. पण त्यांनी हार न मानता 2018 ला UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आणि राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी बनल्या.
सागर राणा हरियाणाचे रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
2018 ला त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत आयपीएस अधिकारी बनले. त्यांचे पहिलं पोस्टिंग एसपी संचौरमध्ये करण्यात आले होते. सागर हे जयपूरमध्ये डीसीपी ट्रॅफिक म्हणून तैनात होते.
रंजिता शर्मा आणि पती सागर राणा हे दोघेही 2019 बॅचचे IPS अधिकारी आहेत.