Ranjeetsingh Naik Nimbalkar : दिग्गजांचा पत्ता कट करून दिल्लीचे तिकीट दुसऱ्यांदा मिळविणारे रणजितसिंह निंबाळकर

Vijaykumar Dudhale

भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात 2019 मध्ये प्रवेश केलेले फलटणचे रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण समर्थक

रणजितसिंह निंबाळकर हे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

लोकसभेला विजय

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत निंबाळकर यांनी माढ्यातून 85 हजारांच्या मतांनी विजय मिळविला होता.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

माळशिरसमध्ये लाखाचे लीड

मागील लोकसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना सुमारे एक लाखाचे मताधिक्य दिले होते.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

मोहिते पाटील-रामराजेंचा विरोध

मोहिते पाटील यांच्याशी बिनसल्याने यंदा निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला होता. मोहिते पाटील यांच्यासह निंबाळकरांचे पारंपरिक विरोधक रामराजेंनीही रणजितसिंहांना उमेदवारी मिळू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

मतदारसंघातील आमदारांचा पाठिंबा

महायुतीतील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला हाेता. मात्र, माढा मतदारसंघातील फलटण वगळता सर्व आमदारांनी निंबाळकर यांना पाठिंबा दर्शविला होता.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

जयकुमार गोरेंची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण

साताऱ्याचे भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे आपले वजन वापरल्याचे सांगितले जाते. याशिवाय आमदारांनीही त्यांना समर्थन दिले.

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

मोहिते पाटील-रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहिते पाटील आणि रामराजे यांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण माढ्याचे लक्ष असणार आहे.

R

Ranjeetsingh Naik Nimbalkar | Sarkarnama

राजघराण्यातील 'या' सूनबाईंची काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी...

Preneet Kaur | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा