Rashmi Mane
दिल्ली येथील रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांचा स्नेह-भोजन कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार उपस्थित हाेते.
महाराष्ट्र राज्याचे मंत्रिगण, खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब दानवेंच्या दिल्लीतील बंगल्यात अशोक चव्हाणांचे 'Grand Welcome' करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे दिल्लीत 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आले होते.
या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक दिवसांनी सर्वजण एकत्रित आले होते.
'राजकीय व सामाजिक कार्यामध्ये सर्वजण आपापल्या क्षेत्रात पूर्ण वेळ जनसेवेत व्यस्त असतो,' त्यामुळे सर्वांना एकत्र भेटून आनंद झाला' अशी भावना या वेळी दानवेंनी व्यक्त केली.
या वेळेस खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवसदेखील सर्वांनी उत्साहाने साजरा केला.
R