Rashmi Mane
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या जनसुराज या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्यांनी जान्हवी दास यांची लोकांशी ओळख करून दिली.
प्रशांत किशोर बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी या परिषदेचे आयोजन केले होते. राज्यातील जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.
जनसुराज या संघटनेच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी महिला संघटन मजबूत करण्यासाठी नुकताच महिला मेळावा घेतला.
प्रशांत किशोर हे एक राजकीय रणनीतीकार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये 8 वर्षे काम केले. तसेच त्यांनी भारतातील राजकारणात पहिल्यांदा भाजपसाठी काम केले आणि नंतर जेडीयू, काँग्रेस, आप, वायएसआरसीपी, डीएमके आणि टीएमसी या पक्षांसाठी काम केले.
प्रशांत किशोर यांचे लग्न आसाममधील गुवाहाटी येथे राहणाऱ्या जान्हवी दासशी झाले असून, त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. पीके आणि जान्हवी यांची भेट युनायटेड नेशन्सच्या एका आरोग्य कार्यक्रमादरम्यान झाली, तिथून त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न केले.
जान्हवी दास क्वचितच राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसतात. मात्र, पाटणा येथे झालेल्या जनसुराज महिला संमेलनात प्रशांत किशोर यांनी त्यांची ओळख करून दिली. जान्हवी पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमात दिसल्या.