Rashmi Mane
हिंदी सक्तीविरोधात आज मराठी अस्मितेसाठी वरळीमध्ये मराठीचा बुलंद आवाज ऐतिहासिक सभा पार पडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कधीही न पाहिलेले खास फोटो!
राज-उद्धव ठाकरे यांच्या दुर्मिळ फोटोच्या माध्यमातून पाहा बंधूभावाचं प्रेम जपणारे काही खास क्षण.
राज्यात मराठी आणि हिंदी भाषेच्या वादाने वातावरण तापलं आहे. मराठीवर अन्याय नको म्हणून जनतेत रोष वाढत आहे.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, "एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी; आमच्यातील अंतरपाट अणाजीपंतांनी दूर केला" असं म्हणतं उद्धव ठाकरेंकडून युतीची घोषणा केली आहे.
या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र मंचावर मराठीसाठी एकत्र आले आहेत.
वरळीतील सभेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल. "मराठीचं अपमान खपवून घेतला जाणार नाही" असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे हे नक्की!