Neha Chhipa : भाजपच्या आमदाराला भिडणाऱ्या दबंग अधिकारी; 15 दिवसांतच झाली बदली...

Rajanand More

राजस्थानातील धडाकेबाज अधिकारी

राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत 48 वी रँक मिळवत 2018 मध्ये सेवेत दाखल. धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख.

Neha Chhipa | Sarkarnama

शाळेत हुशार

इयत्ता दहावीत 93 टक्के आणि बारावीत 80 टक्के गुणांनी उत्तीर्ण. त्यानंतरच त्यांनी 2017 पासून केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्यासाठी तयारी सुरू केली होती.

Neha Chhipa | Sarkarnama

आमदारांनी दिली धमकी

भाजपचे शाहपुरा मतदारसंघाचे आमदार लालाराम बैरवा यांनी 15 दिवसांपूर्वी एका कामावर बोलताना नेहा छीपा यांना नवीन नोकरी आहे, तुम्हाला त्रास होईल, अशी धमकी दिली होती.

Lalaram Bairwa | Sarkarnama

मागे हटल्या नाहीत

भीलवाडातील बनेडाच्या उपविभागीय अधिकारी असलेल्या नेहा मागे हटल्या नाहीत. दर्जेदार कामासाठी त्यांनी थेट आमदारांशी वाद घातला.

Neha Chhipa, Lalaram Bairawa | Sarkarnama

संघटना ठामपणे मागे

आमदारांच्या कृतीनंतर राजस्थान प्रशासकीय सेवा संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली.

Neha Chhipa | Sarkarnama

छीपा समाजाचे आंदोलन

छीपा समाजातील नागरिकांनीही नेहा यांना पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन.

Neha Chhipa | Sarkarnama

चौदा दिवसांत बदली

आमदाराशी झालेल्या वादानंतर नेहा यांची चौदा दिवसांतच बदली. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता. काँग्रेसकडून भाजप सरकारवर टीका.

Neha Chhipa | Sarkarnama

पोलिस अधिकाऱ्याला पकडले होते रंगेहाथ

खडीची चोरी करणाऱ्या एका ट्रॅकचा केला होता पाठलाग. पोलिस अधिकाऱ्याचा खडी माफियांशी असलेला सहभाग आणला समोर.

Neha Chhipa | Sarkarnama

चर्चा फक्त नेहा छीपा यांचीच...

राजस्थान सरकारने 193 आयएएस-आरएएस अधिकाऱ्यांची बदली केली. पण सर्वाधिक चर्चा नेहा यांच्या बदलीची होत आहे.

Neha Chhipa | Sarkarnama

NEXT : पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकची संधी असलेल्या शेख हसीना कोण?

येथे क्लिक करा