Roshan More
आज बांग्लादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. बहुमत मिळणारा पक्ष सत्ता स्थापन करेल. सर्व्हेनुसार शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होतील, अशी शक्यता आहे.
देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे ही निवडणुकीत शेख हसीना यांचा पक्ष 'अवामी लीग' पुन्हा सत्तेत येईल.
'अवामी लीग' पुन्हा सत्तेत आला तर शेख हसीना या सलग तिसऱ्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान होतील.
शेख हसीना या बांग्लादेशचे स्वातंत्र्यसैनिक, पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान यांची मुलगी आहे.
1996 मध्ये शेख हसीन या पहिल्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान झाल्या.
शेख हसीना यांच्या काळात बांग्लादेशचा विकास दर हा भारताच्या विकास दरापेक्षा अधिक आहे.
शेख हसीना यांच्यावर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात टाकत असल्याचा आरोप आहे.
विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीच्या नेत्या खालिदा झिया या नजर कैदेत आहेत. त्यांच्याच पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे
शेख हसीना या पंतप्रधान झाल्यापासून भारताशी असलेले संबंध त्यांनी अधिक दृढ केले आहेत.
NEXT : छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावर जोरदार हल्ला, काय