Mayur Ratnaparkhe
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्ला यांना जवळपास सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतरही मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असणार आहेत.
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत होते.
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं.
रश्मी शुक्ला यांनी सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकपदाचा कार्यभारही स्वीकारला होता.