Rashmi Mane
अनेकांची प्रेरणा असलेले उद्योगपती रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे.
टाटा समुहाचे अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.
रतन टाटा नवल टाटा यांचे दत्तक पुत्र आहेत.
रतन टाटा यांनी 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन या विषयाचे शिक्षण घेतले आहे.
रतन टाटा हे 'टाटा सन्सचे एमेरिट्स' अध्यक्ष आहेत.
मिठापासून ते संरक्षण दलांसाठी विमाने तयार करण्यापर्यंत तब्बल ३० कंपनी चालवणारे रतन टाटांचा TATA ग्रुप जगातील 100 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.
आज टाटा समूहामध्ये सात लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. रतन टाटा हे आपल्या नफ्यामधील 66% वाटा समाजासाठी दान करतात.