Rashmi Mane
लखनौ विद्यापीठात इंग्रजी साहित्यात एमए करणाऱ्या रत्ना यांनी कधीही कल्पना केली नव्हती की त्या UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील.
रत्ना यांनी यूपीएससीचा अभ्यास फारसा गंभीरपणे घेतला नव्हता पण तिला अभ्यास करणाऱ्या मैत्रिणींची त्यांना साथ मिळाली. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
तिच्या मैत्रिणींनी फॉर्म भरल्यावर त्यांनीही अर्ज केला. रत्ना सांगतात की, 1987 मध्ये इतक्या कोचिंग इन्स्टिट्यूटही नव्हत्या आणि शिक्षणावर खर्च करण्याची लोकांची क्षमताही नव्हती.
अशा परिस्थितीत आम्ही सर्व मित्रांनी एकाच जागी बसून एकमेकांशी चर्चा करायचो आणि ग्रुप स्टडी करायचो, पण जेव्हा मी UPSC ची परीक्षा दिली तेव्हा माझी 'प्री'परीक्षेमध्ये निवड झाली.
त्यानंतर त्या अभ्यासाबाबत गंभीर झाल्या आणि मुख्य मुलाखतीसाठी अशा प्रकारे तयारी केली की त्यांना यश मिळाले. अंतिम परीक्षेत निवड झाली तेव्हा त्यांना 'आयपीएस' कॅडर मिळाले. पण त्या रुजू झाल्या नाहीत रत्ना सांगतात की, तिच्या वडिलांनी तिला IPS न होण्याचा सल्ला दिला होता.
त्यामुळे त्यांनी इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स सर्व्हिस (IAAS) मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. रत्ना यांनी 21 वर्षे ऑडिट, संरक्षण मंत्रालय आणि भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय अशा विविध विभागांमध्ये काम केले आहे.
21 वर्ष काम करूनही समाजासाठी काहीतरी करायला हवं असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी 2008 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि व्हीआरएस घेतली. यानंतर त्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सामील झाल्या आणि सामाजिक परिवर्तनासाठी काम करू लागल्या. त्यांनी सुमारे चार वर्षे ऑक्सफॅम इंडियाच्या ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम केले