Aslam Shanedivan
कोकणासह राज्यात पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत असून विविध ठिकाणी दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत.
मुंबईत देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तर रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा पोर्ट टर्मिनलवर चक्रीवादळामुळे दुर्घटना घडली. येथे कंटेनर कोसळून एका कामगारांचा मृत्यू झाला.
आता रत्नागिरीत मोठी घटना समोर आली असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकातील छत कोसळले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाल्याची घटना घडली नाही.
कोट्यावधी रुपये खर्च करून रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असताना आता छताचा तब्बल ५० ते ६० फुटांचा मोठा भाग अचानक कोसळला.
पहिल्याच मोठ्या पावसात हे छत कोसळल्याने रेल्वे प्रशासनाचा आणि कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे.
मात्र या घटनेमुळे रेल्वे स्थानकाच्या केलेल्या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.