Jagdish Patil
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन झाले.
शनिवारी (ता.१२) पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तर काँग्रेसचा अभ्यासू आणि निष्ठावंत नेता अशी ओळख असलेल्या महाजन यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
रत्नाकर महाजन यांचा जन्म १४ जून १९४६ पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला.
महाजन हे डॉक्टर होते. मात्र, समाजवादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला.
ते १९९९ ते २००९ या काळात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते, तसेच काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते होते.
'शिदोरी' या काँग्रेसच्या विचारपत्रिकेचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
राष्ट्र सेवा दल, युवक क्रांती दल (युक्रांद) आणि भारत जोडो अभियान अशा अनेक चळवळीत ते सक्रीय होते.
राष्ट्र सेवा दल आणि युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्पष्ट राजकीय भूमिका घेतली.