सरकारनामा ब्यूरो
अनेक दिवसांपासून बॉलीवूड चित्रपटसृष्टीपासून रवीना टडंन लांब आहे तरीही, OTT प्लॅटफाॅमवर छोट्या मोठ्या भमिका साकारताना ती दिसते.
काही दिवसापूर्वी रवीना टडंन एका यूपीच्या पोलिसांच्या पॉडकास्ट 'बियाँड द बॅज' च्या भागात पाहुणी म्हणून आली होती.
कार्यक्रमाच्या भागात तिने, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदीं यांच्या कामांमुळे प्रचंड प्रेरित होऊन IPS अधिकारी बनत पोलिस सेवेत सहभागी होण्याच्या इच्छेबद्दल सांगितले.
परिस्थितीमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत यावे लागले. असं तिने यावेळी सांगितले. "माझा चित्रपटांत काम करण्याचा प्लॅन नव्हता पण, वडील चित्रपटसृष्टीत असल्याने पहिला चित्रपट मिळाला.
‘पत्थर के फूल’ चित्रपट त्यांनी त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरुन स्वीकारला आणि बाॅलीवूडसृष्टीतील कारकीर्दाला सुरुवात केली.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ती यूपीला गेली होती. यावेळी तिने काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यावेळी तेथील सुरक्षा आणि सुविधासाठी पोलिस अधिकाऱ्याचे तिने खूप कौतुक केले.
पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक करत 'महिला पोलिस' या खरोखरचं 'वाघिणी' आहेत असं रवीना टंडन यावेळी म्हणाली.
"काॅलेजमध्ये असताना मी किरण बेदींची खूप मोठी चाहती होते. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कारकीर्द पाहून मला प्रेरणा मिळाली. आम्ही त्यांच्या धाडसाबद्दल काॅलेजमध्ये नेहमी ऐकायचो, असे रवीनाने सांगितले.
"पदवीनंतर आयपीएस व्हायचं स्वप्न चित्रपटामुळे राहून गेले पण, आता चित्रपटांच्या माध्यमातून अनेक वेळा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळते."असंही ती म्हणाली.