Rashmi Mane
पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि ॲप्रॉन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधान भवनात पोहाेचले.
राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेली ड्रग्ज प्रकरणे यावरूनही विरोधक आक्रमक होत आहेत.
आमदार धंगेकरांनी पहिल्याच दिवशी ललित पाटील प्रकरणात सरकारला घेरलं आहे.
ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून धंगेकरांनी ही मागणी लावून धरली आहे.
हिवाळी अधिवेशनात ललित पाटील प्रकरण चांगलेच गाजणार आहे.
ससून रुग्णालयातील तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर असलेला राजकीय वरदहस्त या प्रश्नांकडे या वेळी धंगेकरांनी लक्ष वेधले आहे.