Rashmi Mane
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सुपारी अन् संत्र्यांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, दुष्काळग्रस्तभागात निधी वाटप आदी मागण्या केल्या.
"शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार 420!" तसेच "खोट्या विकासाच्या टिमक्या किती दिवस वाजवणार! सांगा एकनाथ शिंदे ,बेरोजगारी,महागाई,कधी थांबवणार?" असं म्हणतं महाविकास आघाडीने आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवन परिसरात आगळेवेगळे आंदोलन करून विधिमंडळ परिसर दणाणून सोडले.
घटनाबाह्य, अनैतिक, अत्याचारी, भ्रष्ट, लोकशाहीविरोधी सरकारच्या मोदानीच्या प्रेमाला चाप बसवून सर्वसामान्य जनतेच्या, बळीराजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लावणं हेच आमचं उद्दिष्ट अशी भूमिका आंदोलन कर्त्यांची होती.
राज्यातल्या अनेक प्रश्नांनी हे अधिवेशन गाजणार हे नक्की...
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना सरकार खोटी भूमिका घेत आहे. अशी टीका आमदार अंबादास दानवे यांनी केली.