Ganesh Sonawane
अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये रविंद्र एरंडे याने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे.
रविंद्र एरंडे याचे महिलांसोबतचे 121 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नाशिकच्या सातपूर परिसरात रविंद्र एरंडे राहतो. तिथे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात.
वृत्तपत्र लेखक, पत्रकार, लघुउद्योजक कन्सलटंट ते थेट अश्लील व्हिडीओकांडातील संशयित आरोपी असा त्याचा प्रवास आहे.
त्याने एक जाहीरात कंपनी काढली होती. त्यातून राजकीय नेत्यांच्या प्रिंटिंगची कामे करू लागला व त्याच्या ओळखी बनल्या.
दरम्यान, त्याने स्वतःचे साप्ताहिक आणि युट्यूब चॅनेलही काढले. ज्योतिष शिकून त्याने भोंदू खरातप्रमाणे हात पाहण्याचाही व्यवसाय केला.
व्यावसायिक कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. तसेच ओळखींचा वापर करत महिलांना व्यवसायांच्या परवानग्या काढून देण्याचे काम करू लागला.
यासगळ्यातून त्याची महिलांसोबत जवळीक देखील वाढली आणि त्याचा गैरफायदा त्याने घेतला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.