RAW एजंटची ओळख गुप्त, मग पगार कुणाच्या बँक खात्यात जातो?

Rashmi Mane

RAW एजंट म्हणजे कोण?

रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) हे भारताचं गुप्तचर यंत्रणांपैकी एक आहे. RAW एजंटस देशाच्या सुरक्षेसाठी परदेशात गुप्त मिशन पूर्ण करतात. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाते.

World's top secret agencies | Sarkarnama

RAW एजंट्स कशी निवडले जातात?

IPS, सेना व गुप्तचर यंत्रणांतील उत्कृष्ट अधिकाऱ्यांमधून RAW एजंट्सची निवड होते. त्यांना कठीण ट्रेनिंग व मानसिक तयारीसाठी अनेक कसोट्यांमधून जावं लागतं.

Punishment for Spying on India | Sarkarnama

RAW एजंट्सचं मुख्य काम काय असतं?

भारतविरोधी कारवायांवर नजर ठेवणे, दहशतवाद रोखणे आणि भारताच्या रणनीतिक हितासाठी माहिती गोळा करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते.

Punishment for Spying on India | Sarkarnama

गुप्तता कशी राखली जाते?

RAW एजंट्स दुसऱ्या देशात खोटी ओळख घेऊन राहतात. त्यांच्या खऱ्या कामाची, ओळखीची माहिती अगदी मोजक्या लोकांनाच असते.

Punishment for Spying on India | Sarkarnama

RAW एजंट्सना पगार कसा दिला जातो?

RAW एजंट्सची ओळख गुप्त असली तरी सरकारी नोंदीमध्ये त्यांची खरी माहिती असते. त्याच नावावर त्यांचा पगार खात्यात जमा केला जातो.

Vikas Yadav RAW Agent | Sarkarnama

त्यांचे बँक अकाउंट्स कसे असतात?

RAW एजंट्सकडे एक अधिकृत बँक खातं असतं जे त्यांच्या मूळ ओळखीवर असतं. परदेशी मिशनमध्ये ते वेगळी ओळख वापरतात.

World's top secret agencies | Sarkarnama

कोणी ओळखलं तर?

एखाद्या एजंटची खरी ओळख उघड झाली तर त्याचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे त्यांना कोणाशीही जास्त संपर्क ठेवायला परवानगी नसते.

Punishment for Spying on India | Sarkarnama

Next : एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती वैष्णवी... लग्नाच्या शाही सोहळ्याचे फोटो पाहिले का?

येथे क्लिक करा