सरकारनामा ब्युरो
वैष्णवी हागवणेचा विवाह म्हणजे एक शाही स्वप्न जणू प्रत्यक्षात उतरलं.
लग्नाच्या दिवशी वैष्णवी जेव्हा नाजूक पावलांनी मंचाकडे आली, तेव्हा जणू एखादी राजकन्या अवतरल्याचा भास झाला!
"राजकन्येसारखी वैष्णवी... एका शाही लग्नाचे फोटो आणि अनुत्तरित प्रश्न!"
"सोशल मीडियावर झळकलेले फोटो सांगतात एक गोष्ट – प्रेम, सोहळा, समारंभ… पण वास्तव काही वेगळंच होतं."
लग्नानंतर सतत मानसिक त्रास, पैशाची मागणी… तिचं स्वप्नमय आयुष्य हळूहळू काळोखात जात होतं.
मग इतक्या आनंदी लग्नामागे काय दडले होते? वैष्णवीच्या मनात नेमकं काय चाललं होतं?
या सगळ्याचा परिणाम – वैष्णवीने आत्महत्येचा मार्ग निवडला. एका हुशार मुलीचा जीव गेला... कारण होता 'हुंडा'.
वैष्णवीचा हसरा चेहरा आज एक संदेश देतो – 'तिचं आयुष्य गेलं, पण इतर मुलींसाठी आवाज उठवा हुंडा ही प्रथा बंद व्हायला पाहिजे.