Rajanand More
राज्यातील बँकांमध्ये सर्व कामकाज मराठीतूनच व्हावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले आहे. अनेक बँकांमध्ये मनसेचे कार्यकर्ते जात असून मराठीचा आग्रह धरत आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसैनिकांना तसे आदेश दिले होते. त्यानंतर कार्यकर्ते मराठीसाठी आक्रमक झाले आहेत.
बँकांमधील कामकाजाबाबत मनसेनेच रिझर्व्ह बॅंकेचे एक परिपत्रक समोर आणले आहे. त्यामध्ये बॅंकेतील भाषेच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
परिपत्रकानुसार, बॅंकेतील सगळे सूचना फलक हे इंग्रजी, हिंदी आणि त्या-त्या भागातील स्थानिक भाषेत लावायला हवेत. तसेच ग्रामीण आणि निम-शहरी भागातली पोस्टर्स ही स्थानिक भाषेत हवीत.
आपण ज्या बॅंकेत जातो तिथला प्रत्येक फलक मराठीत आहे ना? नसेल तर तिथे सांगायला हवं. लेखी तक्रार करूनही ऐकले नाही तर रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार करण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.
बँकेतील विविध पुस्तिका पुस्तिका हिंदी, इंग्रजीत असतीलही परंतु त्या स्थानिक भाषेत म्हणजेच महाराष्ट्रात मराठीतही असायला हव्यात. सर्व छापील साहित्य मराठीतही असायला हवे.
ग्राहकांशी बॅंकेचा संवाद होईल तो हिंदी आणि त्याबरोबरच मराठी मध्येही असायला हवा. इथे इंग्रजीचा उल्लेख नाही.
धनादेश म्हणजे चेक लिहिण्यासाठीही रिझर्व्ह बॅंकेनं स्पष्ट केले आहे की, धनादेशावरील भाषा हिंदी आणि इंग्रजीत असली तरी तुम्ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत धनादेशावरील माहिती लिहू शकता.