सरकारनामा ब्यूरो
2024च्या UPSC IES टाॅपर असलेल्या अहाना सृष्टी यांनी त्यांच्या लिंक्डीन अंकाउटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या रहिवासी असलेल्या अहाना सृष्टी यांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर परीक्षा देण्याचे ठरवले.
त्यांनी 2024 ला UPSC (IES) परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी ऑल इंडिया 3री रँक मिळवली.
काही दिवसापूर्वी अहाना सृष्टी यांनी लिंक्डीन अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी UPSC मुलाखतीच्या दिवसापासून ते त्यांच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत.
'त्यांना UPSC परीक्षा उत्तीर्ण करता आली नसती, तर त्यांनी त्यांचा प्लॅन-बी तयार करून ठेवला होता'. अस त्या म्हणाल्या.
"मी पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा असा विचार केला की, हे विषय मला कितपत समजतात हे जाणून घेईन. त्यानंतर दोनदा परीक्षा देण्याचा प्रयत्न करेन, आणि काही दिवसांनी 'प्लॅन-बी' म्हणजे मी पीएचडी करेन. पण विद्यार्थ्यांनी प्लॅन-बी करायचा की नाही हे त्यांच्या तयारीवर अवलंबून असेल'. अस त्या म्हणाल्या
त्यांनी परीक्षेच्या कालावधीत तयारी करताना ज्या मैत्रीणींनी, नातेवाईकांनी मदत केली त्यांचे आभार मानले.
अचानक घडणाऱ्या घटना खरोखरच मानवी प्रयत्नांच्या आणि कल्पनेच्या पलीकडील असतात. ‘देव त्यांनाच मदत करतो, जे स्वतःला मदत करतात’ असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.