Deepak Kulkarni
भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.
रिझर्व्ह बँक नेहमीच बँकधारकांसाठी नवनवीन नियम आणि फायदेशीर योजना लागू करत असते.
आता आरबीआयनं लोकधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या क्रेडिट स्कोरबाबत मोठी अपडेट दिली आहे.
क्रेडिट कार्डचा सातत्यानं वापर करत असलेले किंवा नियमित कर्ज फेडत असलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आरबीआयनं घेतलेला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच एक महत्त्वाचा नियम लागू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केल्यानुसार एप्रिल 2026 पासून क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी अपडेट केला जाणार आहे.
यापूर्वी क्रेडिट स्कोअर एका महिन्यात दोनवेळा अपडेट केला जात होता.
आरबीआयच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती ) निर्देश 2025 नुसार हा बदल करण्यात येणार आहे.
महिन्यात पाचवेळा कर्जदाराची सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना माहिती अपडेट करावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, जी लोकं कर्ज क्रेडिट स्कोअरमुळं रखडलेली आहेत, त्यांना याचा जबरदस्त फायदा होणार आहे.