Aslam Shanedivan
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डेव्हलपमेंटल आणि नियामक धोरणात बदल करत किसान क्रेडिट कार्ड संदर्भात नव्या सूचना केल्या आहेत
याचा मुख्य उद्देश हा शेती आणि त्याच्याशी संबंधित नियमांना एकत्र करणे, व्याप्ती वाढवणे, प्रक्रिया सोपी करणे, नव्या आवश्यकतांचा समावेश करणे आहे.
किसान क्रेडिट कार्डमध्ये बदल केले जाणार असून जनतेकडून आणि संबंधित संस्थांकडून 6 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
नव्या धोरणानुसार पिकांना दोन गटात विभागण्यात आले असून छोट्या कालावधीचं पीक 12 महिने आणि दीर्घ कालावधीचं पीक 18 महिने करण्यात आले आहे
तर किसान क्रेडिट कार्डचा कर्जाचा कालावधी वाढवून 6 वर्ष करण्यात आला आहे.
किसान क्रेडिट कार्डमधून मातीची चाचीणी, रिअल टाईम हवामानाचा अंदाज, ऑर्गेनिक शेतीसाठी पैसे घेऊ शकतात.
नवे नियम व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि ग्रामीण सहकारी बँकांना लागू असतील.
किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील बदलांमुळं शेतकऱ्यांना कर्ज घेणे आणि कर्ज परतफेड करणे अधिक सोपं होणार आहे.