Ganesh Sonawane
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा बालपणीचा एक मजेशीर किस्सा आहे.
पुतीन यांचे बालपण लेनिनग्राड येथील एका जीर्ण इमारतीत गेले.
पुतीन यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहलंय की तिथे उंदरं फार होती.
पुतीन आणि त्यांचे मित्र काठ्यांनी उंदरांना हाकलून लावायचे.
एके दिवशी, एका मोठ्या उंदीरला त्यांनी धाडस करुन कोपऱ्यात घेरलं.
परंतु मग नंतर उंदीर वळला आणि त्याने थेट लहानग्या पुतिन यांच्यावर झडप घातली.
यावेळी उंदराला घाबरुन पुतीन पळून गेले. ते फार घाबरले होते.
या घटनेतून त्यांना एक धडा मिळाला की, कोणताही जीव कितीही लहान किंवा कमजोर असला तरीही जेव्हा त्याच्यावर संकट येतं तेव्हा तोही पलटवार करत हल्ला करतो.
पुतीन म्हणाले, त्यावेळी फार घाबरलो होतो, कारण त्या उंदराची आक्रमकता व पलटवार अनपेक्षित असा होता.
या प्रसंगातून आपल्याला आयुष्यातील एक मोठा धडा शिकायला मिळाला. पुतीन म्हणाले, या घटनेचा त्यांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम झाला.