खिशातील नोटा ना चुरगळणार, ना फाटणार;' रिझर्व्ह बँक आणतंय प्लॅस्टिकच्या नोटा

Jagdish Patil

RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात प्लॅस्टिक किंवा पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा विचार करत आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

चर्चा

पाटणा आणि मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

पर्याय

रोख रकमेची वाढती मागणी, कागदी नोटांच्या छपाईचा खर्च आणि लगेच खराब होण्याच्या समस्येमुळे नवीन पर्याय शोधला जात आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

प्रकल्प

याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक प्लॅस्टिक नोटांचा पायलट प्रकल्प लवकरच सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RBI Polymer Notes | Sarkarnama

खर्च

कागदी नोटांपेक्षा या नोटा कमी खर्चात तयार केल्या जाऊ शकतात आणि त्यांची लाईफही जास्त असते.

RBI Polymer Notes | Sarkarnama

प्लॅस्टिक नोटा

याच पार्श्वभूमीवर आता जगात कोणकोणत्या देशात प्लॅस्टिक नोटा वापरल्या जातात ते जाणून घेऊ या.

RBI Polymer Notes | Sarkarnama

वापर

सध्या जगभरातील 60 देश प्लॅस्टिकच्या नोटा वापरतात. यापैकी काही देशांनी कागदी चलनाता वापर पूर्णपणे बंद केला आहे.

Polymer Notes | Sarkarnama

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया हा प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणणारा जगातील पहिला देश असून 1988 पासून इथे पॉलिमर नोटा वापरतात.

Australia polymer note | Sarkarnama

न्यूझीलंड

न्यूझीलंडने 1999 मध्ये आपल्या सर्व कागदी नोटा चलनातून काढल्या आणि प्लॅस्टिक नोटांचा वापर सुरू केला.

New Zealand plastic note | Sarkarnama

व्हिएतनाम

ब्रुनेइ देशही प्लास्टीक नोटा वापरतो तर व्हिएतनामने 2003 मध्ये पॉलिमर नोटा चलनात आणल्या आहेत.

Vietnam polymer currency | Sarkarnama

रोमानिया

रोमानियाने 2005 मध्ये पॉलिमर नोटाचा वापर सुरू केला. तर पापुआ न्यू गिनी या देशातही केवळ प्लॅस्टिक नोटा वापरतात.

Romania polymer banknotes | Sarkarnama

NEXT : इराणशी शांतता चर्चेसाठीचा अमेरिकेच आग्रह असलेला 'अब्राहम करार' काय?

Ibrahim Accord
क्लिक करा