Mayur Ratnaparkhe
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, तसेच भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
'...पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते' असं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला धरुन आज राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. असं भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे म्हणाले आहेत.
'मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही, असे म्हणणे म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही, असा तर अर्थ नाही ना?' असा खोचक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
राज ठाकरेंच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद महाराष्ट्रात आणखी वाढेल आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील. असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
मन माझं त्यात , मी नाही खात,काय नाही त्यात ? तर गूळ नाही त्यात, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
Next : राजकारणासाठी तब्बल 52 एकर जमीन लावली पणाला अन् आता हिंगोलीतून बंडखोरी...