Deepak Kulkarni
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बाबूराव कदम यांच्याविरोधात भाजपच्या रामदास पाटील, योगी शाम भारती महाराज आणि अॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे
महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात वसमतचे अॅड. शिवाजी जाधव यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
हिंगोलीतून भाजपाचे शिवाजीराव जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
राजकारणासाठी त्यांनी आतापर्यंत 52 एकर जमीन आणि कोट्यवधींची मालमत्ता पणाला लावली आहे.
सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आला फोन पण भूमिकेवर ठाम असल्याचे शिवाजीराव जाधव सांगतात.
वसमतची 50 एकर बागायती जमिनीसह नांदेड, पुणे, नोएडा, दिल्ली येथील कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकली.
ही निवडणूक हरलो, तर पुन्हा दिल्लीत जाऊन वकिली करेन असं शिवाजीराव जाधव यांनी सांगितलं आहे.