Instagram Reel बनवा अन् जिंका ₹25 हजार! Gen-Z साठी सरकारची भन्नाट स्पर्धा

Mangesh Mahale

राज्यस्तरीय स्पर्धा

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

इन्स्टाग्राम

१५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. १५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करायची आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

#SaveSoilSaveWater

रीलचा उद्देश,स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे आवश्यक आहे. संबंधित रीलमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करून ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरावा लागणार आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

यशस्वी कामे

माती व पाण्याचे महत्त्व, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवण, शेततळे, बंधारे, किंवा आपल्या गावातील मृद व जलसंधारणाच्या यशस्वी कामांवर रील तयार करता येणार आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

कल्पकता

स्टोरीटेलिंगपासून ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्सपर्यंत विविध कल्पक पद्धतींचा वापर करण्याची मुभा आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

पुरस्कार

विजेता ठरवताना केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्स पाहिले जाणार नाहीत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पुरस्कार आहेत

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

परीक्षण

विषयाची मांडणी, संदेशाची परिणामकारकता, कल्पकता, सादरीकरण, तांत्रिक गुणवत्ता आणि इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर परीक्षण केले जाणार आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

‘युवा मृद-जलदूत’

विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

व्हेरिफिकेशन

स्पर्धेत सहभागी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. माहिती आणि अपडेट्ससाठी मृद व जलसंधारण विभागाच्या सोशल मीडिया अकाउंट्सना फॉलो करता येईल.

Reel for Soil and Water Conservation government competition 2026 | AI

NEXT: तुकाराम मुंढेंचाही रेकॉर्ड मोडला! मुख्यमंत्र्यांवर केली होती कारवाई! ‘लेडी सिंघम’ रूपा मौदगिल; 20 वर्षांत 40 बदल्या

येथे क्लिक करा