Mangesh Mahale
सीमेपलीकडून होणारे स्नायपर हल्ले पाहून ते मोडून काढण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
स्नायपर कोर्स करण्याची इच्छा त्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. वरिष्ठांनी त्यांना परवानगी दिली.
आठ आठवड्यांच्या खडतर बीएसएफ स्नायपर कोर्समध्ये इन्स्ट्रक्टर ग्रेड मिळवणारी सुमन या पहिल्या महिला ठरल्या.
प्रशिक्षणात ५६ पुरुषांमध्ये सुमन कुमारी एकट्या होत्या.
सुमन यांचा जन्म हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातल्या सर्वसामान्य घरातील आहे.
त्यांचे वडील इलेक्ट्रिशन, आई गृहिणी. सामान्य घरातील मुलगी ते स्नायपर असा त्यांचा प्रवास.
२८ वर्षीय सुमन बीएसएफच्या पंजाब युनिटमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
आपली ओळख लपवून कठीण परिस्थितीत कारवाई करण्यासाठी स्नायपर्सना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शत्रूवर अचूक हल्ला करण्यास ते सक्षम असतात.
R