IAS Renu Raj : आधी रुग्णांसाठी 'देव' अन् आता IAS बनत करतायेत जनतेची सेवा; अशी आहे रेणू राज यांची सक्सेस स्टोरी...

सरकारनामा ब्यूरो

रेणू राज

IAS आणि IPS होण्यासाठी बरेच विद्यार्थी लाखोचे पॅकेज सोडून UPSC परीक्षेची तयारी करतात. पण रेणू राज यांनी त्यांची नोकरी सांभाळत UPSC परीक्षेची तयारी केली.

Renu Raj | Sarkarnama

केरळच्या रहिवासी

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रेणू यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. घरची अर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

Renu Raj | Sarkarnama

वडील बस कंडक्टर

वडील राजकुमारन नायर हे बस कंडक्टर तर आई गृहिणी होती. दोघांनीही लेकीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

Renu Raj | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी प्राथमिक शिक्षण सेंट टेरेसा उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर कोट्टायम येथून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS ची डिग्री मिळवली.

Renu Raj | Sarkarnama

तयारी

कोल्लम जिल्ह्यातील ASI हाॅस्पिटलमध्ये नोकरी करू लागल्या. नोकरी करतच त्यांनी UPSC परीक्षेती तयारी सुरु केली.

Renu Raj | Sarkarnama

IAS अधिकारी

2014ला दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IAS बनल्या. IAS बनल्या नंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदाचा कार्यभार सांभाळला.

Renu Raj | Sarkarnama

जिल्हाधिकारी

रेणू राज यांनी वायनाड आणि एर्नाकुलमच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.

Renu Raj | Sarkarnama

संचालक

सध्या त्या केरळ सरकारच्या अनुसूचित जमाती विकास विभागाच्या संचालक आणि आदिवासी पुनर्वसन आणि विकास अभियानाच्या विशेष अधिकारी देखील आहेत.

Renu Raj | Sarkarnama

NEXT : लाडक्या बहिणींच्या 2100 साठी आखडता हात; पण महायुती सरकारचं सर्वसामान्यांसाठी 'हे' मोठं गिफ्ट

येथे क्लिक करा...