Jagdish Patil
सध्याचा काळ हा डिजिटल असून प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. या फोनच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी ऑनलाईन पद्धतीने हाताळत असतो.
मग त्यामध्ये कोणाला मेसेज पाठवणं असेल किंवा एखादी बातमी बघणं असेल. शिवाय आता तर आपण आर्थिक व्यवहार देखील मोबाईद्वारे ऑनलाइन करतो.
मात्र, कधीकधी आपली सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक केली जाते. आपले पैसे कुठे आणि कसे गेले काहीच कळत नाही.
सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यास आपण नेमकी दाद कोणाकडे मागायची याबाबतची माहिती आज जाणून घेऊया.
ऑनलाईन फसवणूक झाल्यास तुम्ही दोन पद्धतींनी तक्रार करू शकता, एक सरकारी ऑनलाइन पोर्टलवर आणि दुसरी थेट कॉलद्वारे.
फसवणुकीची नोंद करण्यासाठी cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन तक्रार करू शकता.
तसेच अशा तक्रारीसाठी भारत सरकारने राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल देखील तयार केले आहे. तिथेही तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात.
याशिवाय www.cybercrime.gov.in आणि http://www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर सायबर गुन्ह्यांची तक्रार ऑनलाइन नोंदवू शकता.
हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, बनावट वेबसाइट्स आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी राष्ट्रीय पोर्टलवर तक्रार दाखल करता येते.
ऑनलाइन पोर्टलसह हेल्पलाइनवर 1930 या क्रमांकावर कॉल करून देखील आपली तक्रार दाखल करता येते.