Rashmi Mane
आज आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.
हा प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी खास होता. यंदा कर्तव्यपथावरील परेडमध्ये महिलांचा अधिक सहभाग दिसून आला.
सकाळी 10.30 वाजता परेड सुरू झाली तेव्हा 100 महिलांनी शंख, ढोल आणि इतर पारंपारिक वाद्ये वाजवून परेडची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासात प्रथमच असे घडले.
यावेशी पहिल्यांदाच तीनही दलातील सर्व महिला मार्चिंग तुकडी परेडमध्ये सहभागी झाली होती.
यात तिन्ही दलातील 60 महिला सहभागी झाल्या होत्या. या त्रिवेणी तुकडीचे नेतृत्व भारतीय लष्कराचे कॅप्टन शरण्य राव यांनी केले.
'बीएसएफ' महिला ब्रास बँड आणि सीमा सुरक्षा दलाच्या महिला तुकडीही पहिल्यांदाच परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.
देशाची महिला शक्ती आणि लोकशाही मूल्ये मांडणाऱ्या या भव्य समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.