Republic Day 2024 : कोण असणार यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

Rashmi Mane

प्रजासत्ताक दिन

राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरु आहे.

प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

भारत दौरा

इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज ते जयपूरला पोहोचणार आहेत.

गुलाबी शहर 'जयपूर'

गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा 'जंतर मंतर'ला ते भेट देणार आहेत.

सहावे नेते

प्रजासत्ताक दिनाच्या या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे ते फ्रान्सचे सहावे नेते आहेत.

'रोड शो'लाही राहणार उपस्थित

पीएम मोदी आणि मॅक्रॉन जंतरमंतर ते सांगणेरी गेट असा संयुक्त रोड शो करणार आहेत.

अल्बर्ट हॉल संग्रहालयालाही देणार भेट

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन दोघेही हस्तकला दुकान आणि चहाच्या दुकानाला भेट देतील अशी अपेक्षा आहे. यानंतर दोन्ही नेते ऐतिहासिक अल्बर्ट हॉल संग्रहालयाला भेट देणार आहेत.

Next : जाणून घ्या, 'प्रजासत्ताक दिन परेडबद्दल '7' ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी

येथे क्लिक करा