Pradeep Pendhare
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील एकूण 942 जणांना ‘पोलिस पदक’ जाहीर केली आहेत.
देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक' जाहीर केली.
95 पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’, तर 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्राला ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका'सह एकूण 48 पदक मिळाली. त्यात 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाली आहेत.
महाराष्ट्र कॅडरचे 1996च्या बॅचचे IPS नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले.
नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले.
कोल्हापूर परिक्षेत्रचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले.
राज्य राखीव पोलिस दलात 1985 मध्ये शिपाई म्हणून भरती झालेले प्राचार्य तथा पोलिस अधीक्षक रामचंद्र केंडे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले.